Featured

First blog post

This is the post excerpt.

This is your very first post. Click the Edit link to modify or delete it, or start a new post. If you like, use this post to tell readers why you started this blog and what you plan to do with it.

post

New Scheme of Maharashtra govt for open caste

🚨राज्य सरकार निर्णय 🚨

⛳अण्णासाहेब पाटील महामंडळाचे बदलले रुपडे⛳

मुंबई – मागील वर्षात राज्यभरात मराठा समाजाच्या वतीने शांततेत मोर्चे काढण्यात आले. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्‍वासनानुसार उपसमितीने दिलेल्या निर्देशानुसार अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे रुपडे बदलले आहे. जुन्या असलेल्या दोन योजना बंद करून नव्या तीन योजनांचा समावेश त्यात केला आहे. त्यामध्ये गट प्रकल्पाला बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील उद्योजक बनू इच्छिणाऱ्या व तशी क्षमता असलेल्या तरुणांना आर्थिकसाह्य पुरविण्याच्या दृष्टीने या महामंडळामार्फत बीज भांडवल कर्जयोजना व गट प्रकल्प कर्जयोजना राबविण्यात येत होत्या. या योजनांना मागणी नसल्याने व लाभार्थ्यांनी कर्जाची रक्कम परतफेड न केल्याने शासनावर कर्जमाफी करण्याची वेळ आली. या दोन योजनांचा लाभ जास्त जणांनी न घेतल्यामुळे त्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

नव्या अस्तित्वात आलेल्या तीन योजनांमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज योजनांचा समावेश आहे. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांना या योजनांचा लाभ घेता येईल. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेमध्ये 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मंजूर केलेल्या उमेदवाराने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास व्याजाची रक्कम 12 टक्‍क्‍यांपर्यंत संबंधित लाभार्थ्यांच्या आधारलिंक असलेल्या बॅंक खात्यात जमा केली जाणार आहे.

दहा ते 50 लाखांपर्यंत कर्ज

गट कर्जव्याज परतावा योजनेत दहा ते 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल. यात 15 लाखापर्यंतचे कर्ज घेतलेल्या गटाने वेळेत हप्ता भरल्यास 12 टक्के व्याजदराने व्याजाचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा केले जातील. व्याजाची रक्कम दरमहा महामंडळातर्फे जमा केली जाईल.

गट प्रकल्प कर्ज योजनेत पात्र शेतकरी उत्पादक कंपन्यांना 10 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज उद्योगासाठी दिले जाणार आहे. त्यामुळे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या नव्या कर्ज योजनांचा लाभ घेण्यासाठी मराठा समाजातील तरुणांनी अर्ज करणे गरजेचे आहे. सरकारने घातलेले निकष पूर्ण करून या तीन योजनांचा लाभ त्यांना घेता येणार आहे.

Plz contact me @9579791880 for more details . Thanks

Again daya …

सकाळचे 8:30,
आवरून बाहेर पडलोय.
कुठे जायचे, काय करायचं, काहीच ठरलेले नाहीये.

मी फोन लावतो.
‘हा, सांग रे’ – पलीकडून फ्रेश आवाज येतो.
इतर दिवशी, ह्यावेळी पेंगुळलेल्या आवाजात बोलणारी आमची स्टाफ, माझी मैत्रीण.
‘अरे, आज लवकर’ – मी
‘हो रे, फिल्मला चाललोय.
पद्मवत’
‘हो का, मी तिकडे यायचा विचार करत होतो.’ – मी
‘ये ना, मी आणि ………आहोत, दोघीच.
तिघे मिळून जाऊ’
‘नको, दोघीच एन्जॉय करा.’ – एवढे बोलून फोन ठेऊन देतो.

हॉटेलमध्ये नाश्ता करतो,
गांधी सर्कलला येतो.
पाठोपाठ पणजी बस येते.
मी बसतो.

पणजी बस स्थानक,
बाहेर येतो.
कुठं जायचं?
मनात प्रश्न उठतो.
‘पणजी मार्केट?’ – मनच उत्तर देत.
पाय रस्ता धरतात.

पालिकेची पार्किंगची बिल्डिंग,
त्यावर एक परदेशी तरुण चित्र काढताना काही दिवसांपूर्वी बघायचो.
त्याकडे नजर जाते.
आपसूक हात सॅकमधून कॅमेरा बाहेर काढतात.
क्लिक, क्लिक.

पुढे छोटासा पूल आहे.
त्या अगोदरच एक लोखंडी पाईपचा खांब मोडून निघालाय.
त्याचा राहिलेला भाग मला खुणावतो.
उजव्या बाजूने गाड्या पळत असतात.
मी खाली बसून त्यावर फोकस करण्याच्या प्रयत्नात असतो.
क्लिक…

कित्येक जण असतात ना,
अशीच,
कोपऱ्यात ढकललेली.
मरण येत नाही म्हणून जगत असतात.
मला तो खांबाचा भाग माझ्यासारखाच वाटतो….

पेट्रोल पंपाला लागून एक पुतळा आहे.
गोव्याचे पहिले मुख्यमंत्री,
‘श्री. दयानंद बांदोडकर’ यांचा.

अनेक पुतळे असतील आपल्या देशात,
महापुरुषांचे, प्रेरणादायी व्यक्तींचे.
त्यांचे किती विचार आपण आचरणात आणतो.
त्यांचा वापर फक्त,
राजकारण, जातीवाद………..
मी खालमानेने पुढे सरकतो.

‘आदिलशाह पॅलेस’,
गोवा, पहिले आदिलशाहीकडे होता.
त्यावेळी बादशहाने ‘मांडवी’ नदीकिनारी बांधलेली इमारत.
त्याच्या समोरून चालत राहतो.
‘हॉटेल मांडवी’समोर येतो.
त्याच्या भिंतीवर कोरलेले शिल्प लक्ष वेधून घेते.

त्याच्या गल्लीतून चालत चालत ‘कॅफे भोसले’समोर येतो.
तेथील एक दुकानातून सिगरेट घेतो.
बाजूला जाऊन शिलागवून झाडाखाली बसतो.
मोकळे बसलं की विचार मेंदू कुरतडायला चालू करतात.
मोबाईल काढतो.
फेसबुक उघडतो.
सकाळीच मी एक पोष्ट टाकलेली असते,
जी माझ्यासाठी महत्वाची असते.
तिला कोणी कोणी उत्तर दिलंय बघतो.
पोष्टी वाचायला, कॉमेंट टाकायला लागतो.

वेळ झालेला असतो,
उठतो,
इकडे तिकडे बघत चालत असतो.
एका जुन्या इमारतीचा जुना बंद असलेला दरवाजा खुणावतो.
मी निरखून बघतो,
अतिजुन्या कुलुपाची खाच दिसते.
कदाचित पोर्तुगीज काळातील असावे.
क्लिक……..

एका चौकात येतो.
माझ्या डाव्याबाजूला ‘पणजी चर्च’ दिसते.
समोर एक हॉटेल आहे.
एक कॉफी मारतो.
बाहेर येतो.
पुन्हा डोळ्यांना कॅमेरा लावतो.
क्लिक, क्लिक….

त्या बाजूने चालत चालत ‘रुआ दि ऑरें’ किंवा ‘नेवगी नगर’च्या बाजूला येतो.
रस्त्यात वेगवेगळ्या प्रकारचे दाराचे कोयंडे दिसतात.
पुन्हा ते मानवी जीवनाशी निगडित वाटतं.
कित्येकांनी आपापल्या आठवणींच्या कप्प्यांना किती कुलपे लावली असतील.
‘तुझं पण तसंच आहे की रे दया’ – आतून जाणवत,
मी हसून पुढे सरकतो.

समोरचा छोटासा पदचारी पुलाजवळ येतो.
त्याच्या दोन्ही बाजूने रंगीत फरशींच्या तुकड्याने बनवलेली कलाकृती मी काही दिवसांपासून बघत असतो.
‘सुंदर’ – पुन्हा एकदा तोंडात शब्द येतो.

काही क्षणासाठी तो पूल निर्मनुष्य होतो.
आणि
मनात विचार येतो.
‘आपला रस्ता पण असाच आहे,
दूर दूरवर आपली मंजिल दिसत नाही,
आपला रस्ता बरोबर आहे ना?’…..
एक व्यक्ती त्यावरून जाऊ लागते,
मी जागा होतो.
पुन्हा डोळ्यांना कॅमेरा लागतो.

आता,
मी ‘पाटो’मध्ये आहे.
पणजी बस स्टँडच्या मागचा बिझनेस एरिया.
तिकडे गेलो की नेहमीचे कॉफी पिण्याचे हॉटेल उघडे आहे का बघावे, आणि बस स्टँडकडे जायचा तोच रस्ता आहे, त्यावर चालत सुटतो.
एका फाटकाच्या खालच्या बाजूला लक्ष जाते.
एक फुल, त्याच आयुष्य संपायच्या वेळेवर आहे.

खाली बसून फोटो घेतो.
मागे कोणीतरी येऊन उभे असल्याचे जाणवते.
फोटो घेऊन मी उभा राहतो.
मागे चपट्या नाकाची, मिचमीच्या डोळ्यांची वयस्क व्यक्ती असते.
‘वीच कॅमेरा?’ – तो विचारतो.
मी कॅमेरा त्याच्याकडे करतो.
‘ओह, ज्यापनिस प्रोदोक्त’ – तो.
मी हसून मन डोलावतो……

पणजी बस स्टॅन्ड,
पाठीला सॅक,
हातात बिसलेरी,
गळ्यात कॅमेरा बघून एक व्यक्ती माझ्याकडे येत विचारते,
‘हॅलो, टॅक्सी’
मी हसून मान नकारार्थी डोलावतो.
पुढे सरकतो.

सूर्य डोक्यावर आलेला असतो.
थोडं थकल्यासारखं वाटत असते.
पण
जास्तवेळ थांबत नाही,
कारण
ओल्ड गोव्याला जायची बस लागलेली असते.

#भटकंती
#असंच_मनातलं
दया म्हेत्रे

Age n intelligence

सुहास,
माझा मित्र.
नेहमी म्हणत असतो.
‘वयाचा आणि बुद्धीचा काही संबंध नसतो’
.
.
.
आणि,
माझ्याकडे बघितलं की,
ते शंभर टक्के खरं असल्याचं तुम्हाला जाणवतं.

#असंच_मनातलं
दया म्हेत्रे 02/02/2018

#मराठी

https://www.facebook.com/profile.php?id=100009794520910

അർത്ഥമില്ലാത്ത ജീവിതം

അവനോട് വെറുതെ ചോദിച്ചതാണ് … എന്തിനാട ഇങ്ങനെ ജീവിക്കുന്നത് എന്നു. അവൻ പറഞ്ഞു… “അറിയില്ല”

പിന്നെ അവൻ ആത്മഗതമെന്നോണം പലതും പുലമ്പുന്നുണ്ടായിരുന്നു. വയറു നിറക്കാൻ… കുടുംബം പോറ്റാൻ…